BJP | भाजप म्हणजे वाचाळवीर पक्ष; ” मोदी म्हणजे स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म”; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

BJP | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणाले होते.

हे प्रकरण मिटत नाही तोवरच चंद्रकांत पाटील यांनी देखील चुकीचं विधान केल्याने यात भर पडली. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशातच आता पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान (Saumitra Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना केली आहे.

स्वामी विवेकानंदांच्या 161 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये रॅली काढण्यात आल्या. याच दरम्यान, सौमित्र खान यांनी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, असे सौमित्र खान म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

सौमित्र खान हे पश्चिम बंगालमधील भाजपाचे खासदार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर खान यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत. मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटते,” असे सौमित्र खान (Saumitra Khan) म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

पैठणमधल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.”

काय म्हणाले होते सुधांशु त्रिवेदी?

“सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं.

भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य नेमकं काय?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल होतं.

महत्वाच्या बातम्या :