Hasan Mushrif | किरीट सोमय्यांना येऊ द्या; माझे कार्यकर्ते… – हसन मुश्रीफ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीकडून दोनदा छापेमारी करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या घरावरील छापेमारीमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध देखील केला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मुश्रीफांना खुले आव्हान दिले.

“कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होतं. त्यामुळे मला रोखलं गेलं होतं. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असं खुलं आव्हान देत किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी हसन मुश्रीफ यांना डिवचलं. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांना येऊ द्या. त्यांनी दर्शन घ्यावं. माझ्या कामाची माहिती घ्यावी. माझ्या सार्वजनिक जीवनाची माहिती घ्यावी. माझे कार्यकर्ते मंदिराकडे जाणार नाहीत. कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असं आवाहन करतो. त्यांनी जे आरोप केलेत त्याचे मी सर्व खुलासे केले आहेत, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या