Samsung Galaxy S23 | टीम महाराष्ट्र देशा: कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक मोबाईल (Mobile) लाँच करत असते. त्यामुळे सॅमसंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कंपनी 01 फेब्रुवारीला भारतामध्ये सॅमसंग गॅलेक्सी S23 (Samsung Galaxy S23) सिरीज लाँच करणार आहे. या सिरीज अंतर्गत कंपनी 03 स्मार्टफोन बाजारामध्ये सादर करणार आहे. ही सिरीज लाँच होण्यापूर्वीच यामधील स्मार्टफोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. कंपनी मोबाईल प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना एक खास ऑफर देत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S23 सिरीज अंतर्गत मोबाईल प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना दोन हजार रुपये टोकन रक्कम जमा करावे लागणार आहे. तुम्ही सॅमसंग स्टोअरवरून किंवा Samsung.com या वेबसाईटवरून देखील फोन बुक करू शकतात. हा मोबाईल प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी 5000 रुपयांचे व्हाउचर देणार आहे. या व्हाउचरमुळे मोबाईलची किंमत कमी होणार आहे.
कंपनी सॅमसंग गॅलेक्सी S23 या सिरीज अंतर्गत बाजारामध्ये तीन मोबाईल सादर करणार आहे. यामध्ये Samsung Galaxy S23, Samsung Galaxy s23 Plus आणि Samsung Galaxy s23 Ultra या मॉडेल्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 8 gen 2 soc वर काम करतील. यामध्ये कंपनीच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास 80,000 रुपये असू शकते. तर, या व्हेरीयंटच्या टॉप मॉडेलची किंमत 1,20,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S23 सिरीजच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 6.1इंच HD प्लस AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोन्समध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल. ही बॅटरी 25W चार्जिंगला सपोर्ट करेल. सॅमसंगच्या या सिरीजमध्ये एक TB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध असू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Indian Army Recruitment | भारतीय लष्करामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा, आजच करा अर्ज
- Nana Patole | “बंडखोर सत्यजीत तांबेंला काँग्रेस पाठिंबा देणार नाही”- नाना पटोले
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर करा ‘या’ टिप्स फॉलो
- Amit Deshmukh | भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “लातूरचा देशमुख वाडा…”
- Rupali Patil | “कपटी, खोट्या तिरिट सोमय्या भाऊ, अंबाआईच तुम्हाला दर्शन देणार नाही”