Share

‘या’ आरोपावरून ओमराजे निंबाळकरांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

खासदार निधी खर्चावर झालेल्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी 2019-24 काळातील निधी 100 टक्के खर्च केल्याचा दावा केला.

Published On: 

Omraje Nimbalkar

मुंबई : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पक्षांतराच्या कारणांमध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर खासदार निधीच्या वापरावरून चर्चांना सुरूवात झाली.

याच पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. 2019 ते 2024 या कार्यकाळात मिळालेला खासदार निधी 100 टक्के खर्च केल्याचा दावा त्यांनी केला.

“निधीचा एक रुपयाही अखर्चित नाही”

ओमराजे निंबाळकर म्हणाले, “2019 ते 2024 या माझ्या कार्यकाळातील निधीतील एक रुपयाही अखर्चित नाही. सर्व निधी 100 टक्के खर्च झाला आहे. याबाबत कोणालाही शंका असल्यास MPLAD च्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती तपासता येईल. खासदार निधी खर्च करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी मिळतो. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच निधीच्या वापराचे मूल्यमापन केले पाहिजे.”

“18 कोटींचा आकडा का दिसतो?”

निधीच्या आकड्यांबाबत स्पष्टीकरण देताना निंबाळकर म्हणाले की, “खासदारांना दरवर्षी पाच कोटी रुपये निधी मिळतो. पाच वर्षांत हा निधी 25 कोटी रुपयांपर्यंत असतो. मला आता 15 कोटी रुपये मिळाले, मात्र मागील खासदारांनी खर्च न केलेले 3 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे एकूण 18 कोटींचा निधी दिसत आहे. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यास इतर भागांमध्ये विकासकामांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे निधीचे नियोजन करावे लागते.”

पक्षांतराच्या निर्णयावरही भाष्य

पक्षांतराच्या निर्णयाबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, सातत्याने मतदारसंघात काम केले. मात्र काम करूनही राजकीय परिस्थिती बदलत गेली. आम्ही काम करत नसू तर लोकांनी आम्हाला प्रश्न विचारावा. मात्र धाराशिव मतदारसंघात सातत्याने काम करूनही अपेक्षित राजकीय यश मिळाले नाही. जनतेचा कौल सत्तेच्या बाजूने गेला, त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत निर्णय घ्यावा लागला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही