Dilip Walse Patil | “पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?” – दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

दरम्यान, काल झालेल्या या घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

सुधीर तांबे (sudhir tambe) यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता या सगळ्या गोष्टीला भाजपची फूस होती असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्सचीही चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. काँग्रेसकडून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे इच्छुक होते. मात्र, काँग्रेसनं त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं सत्यजीत यांनी नमतं घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपच होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.