Pankaja Munde | ‘मातोश्री’चे दार उघडे, पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Pankaja Munde | मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (ShivSena Thackeray Group) खुली ऑफिर मिळाली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दार उघडे असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर आता महाराष्ट्रातील भाजपचे पहिल्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, याची खात्री आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दार जरी उघड असले तरी त्या दाराने पंकजा कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष हेच त्यांचे घर आहे. त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत. अशाप्रकारचे विधानं त्यांनी कितीही केले तरी ते राजकीय असतील. त्या विधानांना फार काही महत्त्व नसेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असे थेट आवाहन ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला तर आगामी काळात मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मराठवाड्यात प्रचंड मोठा फायदा होऊ शकतो.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाची ताकद निश्चितच वाढेल. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांचा भल्या मोठ्या समुहाची ताकद ठाकरे गटाच्या पाठीमागे उभी राहू शकते. त्यामुळे भाजपला याचा निश्चितच मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून त्या काय भूमिका घेणार याकडे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.