Share

Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रवारीला संसदेसमोर मांडणार अर्थसंकल्प

Budget 2023 | नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून येत्या 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) गेल्यावर्षीप्रमाणे 2023-2024 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करतील. 2023-2024 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी 31 जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 66 दिवसांमध्ये एकूण 27 बैठका होतील. तर 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. 12 मार्चपासून संसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल. या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.

दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होईल आणि सर्वसाधारण सुट्टीसह 6 एप्रिलपर्यंत चालेल. अमृतकाळात राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य मुद्द्यांवरील आभार प्रस्तावावर चर्चा, अशीही माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Budget 2023 | नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून येत्या 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होणार …

पुढे वाचा

Finance India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now