Chandrakant Patil | “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही”- चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chandrakant Patil  । पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी हे वक्तव्य केले आहे.

“आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते.जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिले आहे”, असे चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले आहेत.

“माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही. तो स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदलली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो”, असेही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले आहेत.

“हिंदू हा धर्म नाही हा एक विचार आहे. हिंदू राजाने कधीही कुठल्या धर्मावर आक्रमण केलेलं नाही. आपला सनातन धर्म 5 हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दातच सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा देव एकच हा विचार मांडला आहे” असेही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe