PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 13 व्या हप्त्याचे खात्यात 2000 नव्हे, तर 4000 रुपये होतील जमा

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. सध्या शेतकरी या योजनेतील तेराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपयांना ऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.

या योजनेमध्ये वाढत्या अनियमित प्रकारामुळे 1.86 शेतकरी अपात्र ठरले आहे. या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी केलेली नाही. या योजनेतील तेराव्या हप्त्याच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे.

दरम्यान, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागले होते. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यांमध्येच बाराव्या हप्त्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची 2000 आणि 12 व्या हप्त्याची 2000 अशी मिळून 4000 रुपये रक्कम येणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे.

पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) हेल्पलाइन नंबर

प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.