Urfi Javed | मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं.
उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आता उर्फी जावेद (Urfi Javed) ने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.
“चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केल्याचा मेल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाठवला आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती त्यांना करणार आहे”, असंही उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितलं. “उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. या संदर्भात उर्फीने ही तक्रार दाखल केली असल्याचं समजतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “तांबे पिता-पुत्रांकडून कॉंग्रेसला दगाफटका, हा धोका…”; नाना पटोले आक्रमक
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 13 व्या हप्त्याचे खात्यात 2000 नव्हे, तर 4000 रुपये होतील जमा
- Chandrakant Patil | “आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही”- चंद्रकांत पाटील
- Uddhav Thackeray | “किरीट सोमय्यांनी आपल्या थोबाडाची काळजी घ्यावी, नाहीतर…”; ठाकरे गटाचा इशारा
- Hair Care Tips | केसांना मजबूत आणि लांब बनवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश