Share

Aaditya Thackeray | “मुंबईची लूट हेच खोके सरकारचे धोरण”; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Aaditya Thackeray | मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण होईल, अशी घोषणा केली होती. त्यासाठी शिंदे सरकारकडून 5 हजार कोटींचं टेंडरही जाहीर करण्यात आलं होतं. पण त्याला कुणी प्रतिसाद न दिल्याने आता शिंदे सरकारने 6 हजार 80 कोटी रुपयांचं टेंडर जाहीर केलं आहे. या कोट्यवधींच्या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा आरोपच आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“या खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरु केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की, याच खोके सरकारने ऑगस्ट महिन्यात 5 हजार कोटींचे रस्तेचे टेंडर काढले होते. त्याला कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते टेंडर स्क्रॅब करण्यात आले”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

रस्त्यांच्या कंत्राटामध्ये जीएसटीचे वेगळे पैसे लावण्यात आले आहेत. याशिवाय कंत्राटाच्या माध्यमातून कंत्राटदारांना तब्बल 48 टक्क्यांचा फायदा करुन देण्याचा हा शिंदे सरकाचा गेम असल्याचा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“मी आजचा जो विषय तुमच्यासमोर ठेवतोय तो फार महत्त्वाचा विषय आहे. कारण हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या जवळचा विषय आहे. आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही अनेक घोटाळ्यांबद्दल बोललो. पण कुठेही कारवाई झालेले दिसत नाही. लाज वाटून राजीनामा घेतलेले दिसत नाही. निर्लज्जपणे सगळा कारभार सुरु आहे. पण आजचा विषय महत्त्वाचा आहे”, असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Aaditya Thackeray | मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) गंभीर आरोप केले आहेत. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now