🕒 1 min read
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे.
या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणावर आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Maratha community should be given 12 to 15 percent reservation – Vijay Wadettiwar
आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “येणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 12 ते 15 टक्के आरक्षण वाढवून दिलं पाहिजे.
मराठा समाजाला जर अडचण नसेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला हवं. यानंतर सर्वांचं समाधान होईल. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर जे काही गुन्हे दाखल झाले आहे ते सर्व गुन्हे मागे घ्यावे, अशी आम्ही मागणी केली आहे.
ज्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं देखील आमचं म्हणणं आहे. या प्रकरणाची निपक्ष कारवाई व्हावी.
विशेष अधिवेशन बोलून आरक्षणाचा मुद्दा एकमताने केंद्राकडं पाठवावा. 18 सप्टेंबर पासून जे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यावा. या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण वाढवून घ्यावं.”
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “या मुद्द्यावर प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असू शकते. ओबीसीमध्ये 370 जाती आहे आणि त्यातील 52 टक्के ओबीसी समाज हा महाराष्ट्रात आहे.
26 टक्के मराठा समाजाची संख्या आहे, असं आपण गृहीत धरू. तरी देखील ही संख्या 76, 77 टक्क्यांवर जाते. 76, 77 टक्क्यांवर जर ही लोकसंख्या जात असेल. तर यामध्ये समाधान कुणाचही होणार नाही. यामध्ये फक्त ओपनचा जास्त फायदा होईल. म्हणूनच हे आरक्षण वाढवण्याची गरज आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Praful Patel | शरद पवारांशी आजही माझं बोलणं होतं – प्रफुल्ल पटेल
- Uddhav Thackeray | मिंधे-फडणवीसांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पेटवापेटवी करायची काय? ठाकरे गटाचा सवाल
- Ajit Pawar | मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी – अजित पवार
- Udayanraje Bhosale | इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? – उदयनराजे भोसले
- Shasan Aplya Dari | जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ ढकलला पुढे; ‘या’ दिवशी होणार कार्यक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











