🕒 1 min read
Shasan Aplya Dari | टीम महाराष्ट्र देशा: 29 ऑगस्टपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणादरम्यान जालन्यात पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर 8 सप्टेंबर रोजी जालना येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.
आतापर्यंत दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता 08 सप्टेंबर ऐवजी 16 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
‘Shasan Aplya Dari’ program will be held in Jalna on September 16
यापूर्वी जालना शहरामध्ये 25 जून आणि 18 ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा हा कार्यक्रम होऊ शकला नाही.
त्यानंतर 08 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत 8 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं.
मात्र, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे हा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. आता 16 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे.
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना चित्रा वाघ म्हणाल्या, “ज्या लोकांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार देखील नाही.
महाविकास आघाडी सरकारनं मिळालेलं आरक्षण घालवायचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलूच नये. ते लोकांना भडकवण्याचं काम करत आहे.
त्यामुळं मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेमध्ये नागरिकांसह पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | ज्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांनी यावर बोलायचं नाही; चित्रा वाघांचा मविआवर टीका
- Vijay Wadettiwar | जालन्यातील घटनेचं खापर मराठा समाजावर फोडू नका – विजय वडेट्टीवार
- Uddhav Thackeray | भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray | शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे जाणार जालना दौऱ्यावर, घेणार मराठा आंदोलकांची भेट
- Sambhajiraje Chhatrapati | मराठ्यांवर गोळी घालायच्या आधी ती माझ्यावर घाला – संभाजीराजे छत्रपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











