Chitra Wagh | ज्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांनी यावर बोलायचं नाही; चित्रा वाघांचा मविआवर टीका

Chitra Wagh | नागपूर: जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दुर्दैवी घटना घडली आहे. मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ज्यांना आरक्षण टिकवता आलं नाही त्यांनी या विषयावर बोलू नये, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Government is playing a positive role – Chitra Wagh

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “ज्या लोकांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही.

जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा त्यांनी मिळालेलं आरक्षण घालवायचं काम केलं आहे. त्यामुळे विरोधकांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.

मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला गेला आहे. त्याचबरोबर ते लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. जालन्यामध्ये घडलेल्या घटनेमध्ये नागरिकांसह पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकार पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायला यशस्वी ठरेल. कारण याबाबत सरकार सकारात्मक भूमिका बजावत आहे.”

दरम्यान, या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “जालन्यात घडलेल्या घटनेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आहे, गृह खात्याचं मोठं अपयश आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर या दुर्दैवी घटनेसाठी सरकारनं मराठा समाजाची माफी मागायला हवी.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.