Sandip Deshapande | मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshapande) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. कोरोना काळातील टेंडर बाबत बोलताना संदीप ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे. महाविकास आघाडीचे नेते मंदबुद्धी तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांचा मेंदू त्यांच्या गुडघ्यात आहे. एक किंवा दोन उद्योग राज्याच्या बाहेर गेले तर हरकत नाही. मात्र, सगळे उद्योग गुजरात कडे जातात हे योग्य नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहे.
“एखाद्या कामाची चौकशी का होऊ शकत नाही? तुम्ही जर भ्रष्टाचार केलाच नसेल तर तुम्ही कशाला घाबरत आहात? भ्रष्टाचार झाला तरी कारवाई करू नका हा कोणता कायदा आहे? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केला.
त्याचबरोबर त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यावर देखील आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल खोटे बोलत आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर केला आहे. इक्बालसिंग चहल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम केली जात होती, असं देखील ते यावेळी म्हणाले आहे. मुंबई महानगरपालिकेसोबतच नागपूर, पुणे, ठाणे या सर्व महानगरपालिकांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- Tirupati | तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल ऑनलाईन पास, जाणून घ्या किंमत
- Suryakumar Yadav | शानदार शतक करूनही सूर्यकुमार होणार टीम इंडियातून बाहेर?
- Pankaja Mundhe | BJP मध्ये संधी का मिळत नाही? पंकजा मुंडे म्हणतात…
- Weather Update | राज्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरणार, तर देशात ‘या’ ठिकाणी थंडीचा रेड अलर्ट
- Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?