Tirupati | तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल ऑनलाईन पास, जाणून घ्या किंमत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tirupati | तिरुपती: देशातील लाखो भाविक दरवर्षी तिरुपती (Tirupati) च्या दर्शनासाठी जातात. तिरुपतीला देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जाते. अशात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात तिरुमला तिरुपती येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे तिकीट भाविक ऑनलाईन बुक करू शकतात. आजपासूनच ही सुविधा भाविकांसाठी उपलब्ध आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीतर्फे तिकिटांची ऑनलाईन बुकिंग आजपासूनच म्हणजे 9 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. हे तिकीट तुम्ही समितीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुक करू शकतात. या तिकिटांची किंमत तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे. 12 ते 31 जानेवारी आणि पूर्ण फेब्रुवारी महिना या कालावधीमध्ये भाविक ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात.

22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये बलायनामुळे भाविकांना दर्शनाला परवानगी दिली जाणार नाही, असं समितीकडून सांगण्यात आलं आहे. तिरुमला येथे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे सध्या वैकुंठ द्वार दर्शन होत असून 11 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी गर्दी वाढली आहे.

तिरुमला तिरुपती येथे दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी पुढील पद्धती फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
  • नंतर जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करून ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर ओपन झालेल्या विंडोवर लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्यासमोर एक कॅलेंडर ओपन होईल.
  • कॅलेंडरमध्ये बुकिंग डेट सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तिथे उपलब्ध असलेला अर्ज भरा.

महत्वाच्या बातम्या