Suryakumar Yadav | शानदार शतक करूनही सूर्यकुमार होणार टीम इंडियातून बाहेर?

Suryakumar Yadav | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये झालेली टी-20 मालिका भारतीय संघाने जिंकली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेमध्ये 2-1 ने विजय मिळवला आहे. राजकोट येथील SCA स्टेडियमवर भारताने या मालिकेतील सामना 91 धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेमध्ये रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आता सर्व खेळाडू एकदिवसीय मालिकेसाठी संघात पडणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया गुहाटीला पोहोचली आहे.

विराट कोहली, के एल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर हे खेळाडू एकदिवसीय संघामध्ये सामील आहेत. टी-20 मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील एक दिवसीय संघाचा भाग आहे. मात्र, त्याच्या जागी संघामध्ये दुसऱ्या खेळाडूला जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सूर्यासमोर श्रेयस अय्यर स्पर्धक म्हणून उभा आहे. कारण श्रेयसने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना प्लेइंग इलेव्हनची निवड करताना थोडी मानसिक कसरत करावी लागणार आहे. कारण यामध्ये सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर दोघेही महत्त्वाचे दावेदार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.