Health Care Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी हिवाळ्यामध्ये मोसमी आजारांपासून ठेवतील दूर

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये बदलत्या वातावरणामुळे संसर्ग आणि मोसमी आजारांचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. अशात लोक अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. पण ही औषधे घेऊन या समस्या कमी होत नाही. त्यामुळे या आजारांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करू शकतात. कारण आयुर्वेदिक पद्धतींचा वापर केल्याने व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो. कारण या आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी लागणारे औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे या गोष्टींचे सेवन केल्याने मोसमी आजार दूर होऊ शकतात. मोसमी आजारांवर मात करण्यासाठी तुम्ही पुढील औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात.

आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी लागणारे औषधी गुणधर्म उपलब्ध – Health Care Tips

तुळस

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटिव्हायरस आणि अँटी इप्लिमेंटरी गुणधर्मांचा समावेश होतो. हे गुणधर्म व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये नियमित तुळशीचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर तुळशीचे नियमित सेवन केल्याने पोटदुखी पासून देखील आराम मिळतो. तुम्ही तुळशीचा रस किंवा चहामध्ये तुळशीचे पानं मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

बडीशोप

बडीशोप माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशोप खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होऊ शकते. कारण यामध्ये अँटिव्हायरस गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे नियमित बडीशोपचे सेवन केल्याने जळजळीची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर याचे नियमित सेवनाने पचनसंस्था ही मजबूत राहते.

आले

आल्यामध्ये माफक प्रमाणात अँटिव्हायरल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म मोसमी आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. आल्याचे सेवन केल्याने घसा आणि पोटदुखीच्या समस्या देखील कमी होतात. त्याचबरोबर आल्याचे नियमित सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून देखील आराम मिळतो. या वातावरणामध्ये तुम्ही चहामध्ये आल्याचे सेवन करू शकतात.

Health Care Tips टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.