🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधार्यांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.
भाजप म्हणजे भाड्याने जमवलेला पक्ष, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP has robbed the country a lot – Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “भाजपनं देशाला खूप लुटलं आहे. भाजप सरकारनं दोनशे रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त केलं आहे. मात्र भाज्या आणि डाळींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
सरकारने गॅस स्वस्त केला. मात्र, त्याच्यावर शिजवायचं काय? या सर्व गोष्टी करून सरकारला काही मिळत नाही, म्हणून सरकार दंगली घडवत आहे. राम मंदिरावर हल्ला करायला मागे पुढे पाहणार नाही, असं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं आहे.
भाजपनं एवढी खालची पातळी गाठली आहे, तरी ते त्यांच्या हिंदुत्वाचा टेंभा मिरवत आहे. त्यांना त्यांच्या जोरावर निवडणुका देखील लढवता येत नाही. त्यांना या सर्व कामांसाठी भाडोत्री लागतात.
भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा. कारण भाजपमध्ये सगळे भाड्याने जमवलेले आहे. जे भाडखाउ आहे, त्यांना देखील त्यांनी त्यांच्यासोबत घेतलेलं आहे. कारण शिवसेना भाड्यावरती चालत नाही तर शिवसेना निष्ठेवर चालते.”
पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “लोकांचा सरकारवरती असलेला विश्वास उडालेला आहे. मात्र, लोकांचा सरकारी जाहिरातींवरती विश्वास आहे.
आपल्याला त्यांचा तो विश्वास देखील खोडायचा आहे. प्रधानमंत्र्यांनी राबवलेली आवास योजना, आवास योजना नाही तर आभास योजना आहे. कारण तो फक्त एक आभास आहे.
सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचा काळ सुरू झाला आहे. 2030 पर्यंत मी सर्वांना चंद्रावर घर देईल, असं देखील नरेंद्र मोदी म्हणायला कमी करणार नाही.”
यावेळी बोलत असताना त्यांनी (Uddhav Thackeray) जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यामध्ये आंदोलकांवर लाठीमार झाला. हे एक फुल आणि दोन हाफ तिकीट यांना माहित नव्हतं का?
कोणाचाही आदेश मिळाल्याशिवाय ही घटना घडू शकत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं आता ते लोक म्हणत आहे. मात्र, घटनास्थळी अद्याप कुणीही पोहोचलेलं नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे जाणार जालना दौऱ्यावर, घेणार मराठा आंदोलकांची भेट
- Sambhajiraje Chhatrapati | मराठ्यांवर गोळी घालायच्या आधी ती माझ्यावर घाला – संभाजीराजे छत्रपती
- Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मराठा समाजातील आंदोलकांची मागणी
- Sanjay Raut | सरकारनं जालना जिल्ह्यात लाठी चार्ज घडवून आणला – संजय राऊत
- Chitra Wagh | सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघांची सुप्रिया सुळेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











