Chitra Wagh | सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघांची सुप्रिया सुळेंवर टीका

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यातील अंतरवरली सराटी येथे काल (1 सप्टेंबर) मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.

या घटनेमध्ये अनेक नागरिक आणि आंदोलन जखमी झाले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.

केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे.

भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Your target is to target Devendra Fadnavis – Chitra Wagh

सुप्रिया सुळे यांना चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “ओ मोठ्ठ्या ताई मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहीला असता.

मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही ?

मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण?ताई, ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि कोर्टात लढाई लढणं या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस जी यांनी केल्या आहेत.

पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुमचं लक्ष्य आहे. राष्ट्रवादी पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली म्हणून तुमची जळजळ होणं स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, ही विनंती आहे.

तुमच्या कार्यकाळात तुम्ही मावळ मध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे.

समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासू वृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे. आता मराठारक्षणाचा खोटा कळवळा दाखवताय? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोईस्कर विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.

आत्ता ही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता मग आत्ताच कसा काय पेटतोय याची सुद्धा चौकशी व्हायला पाहीजे. जर हे जाणून बुजून घडवलं जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहीजे. ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.