Sushma Andhare | देवेंद्र फडणवीसांनी आशिष शेलारांचं अस्तित्व मर्यादित केलंय – सुषमा अंधारे

Sushma Andhare | नांदेड: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दोन दिवसापूर्वी हिंगोली शहरामध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

त्यांच्या टीकेला आशिष शेलारांनी (Ashish Shelar) प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे भाषण, धोरण आणि विचार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

आशिष शेलार यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आशिष शेलार यांचं अस्तित्व मर्यादित केलं असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare ) म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलारांचं अस्तित्व किती मर्यादित ठेवलं आहे? याचा विचार आधी त्यांनी करावा.

कारण काना मागून आलेले लोक तिखट झाले आहे. दरेकर, कंबोज, प्रसाद लाड यांना त्यांच्या कक्षा वाढवून दिल्या आहे. त्यामुळं आशिष शेलार मर्यादित झाले आहे. याबद्दल आशिष शेलार यांनी चिंतन करण्याची गरज आहे.”

Uddhav Thackeray should look at his level and speak – Ashish Shelar

दरम्यान, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याकडं स्वतःचं धोरण, भाषण आणि विचार नाही.

दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहणं, दुसऱ्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं, दुसऱ्यांच्या कार्यक्रमावर थैयथैयाट करणं या सर्व गोष्टींमुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे कार्यक्रम खराब करून घेतले आहे.

उद्धव ठाकरेंनी आपली पातळी बघून बोलायला हवं. कारण भारतीय जनता पक्ष बोलताना कधीच आपली पातळी विसरत नाही. भाजपचा प्रामाणिकपणा हा आमचा दुबळेपणा नव्हे.

आम्हाला देखील उद्धव ठाकरेंना तात्या विंचू, घरबश्या म्हणायचं नाही आणि असं आम्ही त्यांना म्हणणार देखील नाही. उद्धव ठाकरे यांचे अर्धे आमदार आणि अर्धे नगरसेवक त्यांना सोडून पळून गेले आहे. ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानी सारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर और मैं खडक जेलर.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.