Anil Deshmukh | राज्याच्या राजकारणात येणार नवा भूकंप? अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Anil Deshmukh | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडलं? याचा अंदाज बांधणं आता कठीणच नाही तर अशक्य झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटावर टीका करताना दिसले आहे.

अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Anil Deshmukh went to meet Raj Thackeray at 9.30 am

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अनिल देशमुख सकाळी साडेनऊ वाजता राज ठाकरे यांच्या भेटीस गेले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज ठाकरे यांचे राजकीय संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले असल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरे सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना दिसत आहे.

राष्ट्रवादीत फूट पडली होती तेव्हा देखील राज ठाकरेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर खोचक टीका केली होती. सध्या ही परिस्थिती असताना देखील अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी? या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.