Keshav Upadhye | शिल्लक सेनेचा हताश प्रवक्ता; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे.

राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर हल्ला घडू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिल्लक सेनेचा हताश विश्वप्रवक्ता, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांच्या टिकेला केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “शिल्लक सेनेचा हताश विश्वप्रवक्ता हा अशा प्रकारच्या पुड्या सोडण्यात तरबेज झाला आहे.

जनतेला संभ्रमात टाकणे, लोकांची माथी भडकवणे आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा या माथेफिरूचा रोजचा धंदा आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या वेळी हल्ला होईल, हे भाकीत त्याने कशाच्या आधारे केले, त्याचा पुरावा काय ? याची चौकशी करण्यासाठी या भंपक विश्वप्रवक्त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.”

Ayodhya may be attacked during Ram temple inauguration – Sanjay Raut

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलावून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडू शकतो.

अयोध्येमध्ये हल्ला घडवला जाऊ शकतो अशी भीती देशातील प्रमुख नेत्यांना वाटत आहे. पुलवामामध्ये हल्ला घडवून आणला होता, असं म्हटलं जातं. त्याचप्रकारे अयोध्येमध्ये देखील हल्ला घडवून आणला जाऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.