Prakash Mahajan | “भाजप आणि मनसेची युती…” ; मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Mahajan | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणे शक्य नाही असं मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. भाजप आणि शिंदे गटातील लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे म्हणतात आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेत नाही, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या बाजूने विचार करायला हवा, असं देखील प्रकाश महाजन म्हणाले आहे.

भाजपा आणि मनसे यांची युती सध्या होणे शक्य नाही असं भाजप नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. सध्या आम्ही एकट्यानेच लढण्याचा विचार करत आहोत. भाजप आणि शिंदे गटाचे लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे असे म्हणतात. मात्र ते राज ठाकरे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेत नाही. राजकारणामध्ये राज ठाकरे तुम्हाला तुमच्यासोबत पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्या बाजूने विचार केला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

सरकार बदललं तेव्हा आम्हाला त्यांची काही मदत झाली नाही. पण आमची त्यांना मदत झाली आहे. त्यामुळे या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे असं स्पष्ट मत प्रकाश महाजन यांनी मांडलं आहे.

सध्या कुणाची न कोणाची आघाडी होत आहे. पण नागरिक नेत्याची प्रामाणिकता आणि मुंबई विषय असलेल्या कल्पना यावर विश्वास ठेवत आहे. याच मुद्द्यांना घेऊन आम्ही निवडणुका लढणार आहोत, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.