Ambadas Danave | “भाजपला पक्ष फोडण्याची…” ; अंबादास दानवे यांनी केला आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ambadas Danave | यवतमाळ: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी भाजपवर (BJP) आरोप केला आहे. यवतमाळ येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. भाजपने महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्य प्रदेशमध्ये देखील पक्ष फोडले आहेत. त्याचबरोबर त्यांनी कर्नाटकमध्ये देखील पक्ष फोडले आहेत. पक्ष फोडा आणि राज्य करा ही नीती भाजप वापरत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे.

सुरुवातीला भाजपने असं दाखवलं की आम्ही त्यामधले नाही. पण नंतर वहिनीसाहेबांनी (अमृता फडणवीस) यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करून जात होते. त्यामुळे भाजपचा पक्ष फोडण्यात सहभाग आहे हे स्पष्टच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी विकास कामाचं ब्रॅण्डिंगही सुरू केला आहे. या विषयावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “मुंबई आधी पाण्यात बुडत होती. शिवसेनेने मुंबईचा विकास केला आहे. त्यामुळे मुंबई सुरक्षित राहिली आहे. आता पुणे, नागपूर आणि ठाणे यांची परिस्थिती बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेत काम होत आहेत.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचं काम व्यवस्थित पार पडत होतं. नवीन सरकार आलं तेव्हापासून मुंबई महानगरपालिकेचा फक्त उपभोग घेणे सुरू आहे. त्याचबरोबर येथील अधिकाऱ्यांवर अन्याय सुरू आहे. मुंबईकर या गद्दारांना नक्की धडा शिकवतील, असं म्हणत अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या