Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. इंडियाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहे.
तर त्यांची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी ठाकरे गट जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे.
ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मराठीत गाजलेल्या “अशी ही बनवाबनवी” सिनेमातील ते दृश्य. स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु.
“न होणाऱ्या” बाळासाठी खोटी खोटी सजावट. सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले ‘घर’ टिकवता यावे म्हणून धडपड. नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत. “कोणी तरी येणार येणार गं. पाहुणा घरी येणारं गं. हे गाणं गात आहेत..!”
“उबाठा गटाकडून मुंबईत, तथाकथित इंडिया नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना… वरिल दृश्य पटकन आठवते! काय ती होर्डिंग लावत आहेत.
केवढे ते फोटो कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही. भाजपा सोबत होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते.
आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा”, असही त्यांनी (Ashish Shelar) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मराठीत गाजलेल्या " अशी ही बनवाबनवी" सिनेमातील ते दृश्य…
स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु…
"न होणाऱ्या" बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले "घर' टिकवता यावे म्हणून धडपड…
नटूनथटून बाकी मित्र नाचत… pic.twitter.com/l57r9bsVyz— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 29, 2023
India’s meeting in Mumbai is very important – Sanjay Raut
दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील इंडियाच्या बैठकीवर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “मुंबईमध्ये आमचं सरकार नाही तरी देखील आम्ही या ठिकाणी विरोधकांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. आपल्या सरकारनं पक्ष फोडण्याचं काम केलं आहे.
त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक अतिशय महत्त्वाची आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | 2 महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, राज्यात करणार शिवशक्ती दौरा
- Supriya Sule | गृहखात्याचा वचक कुठेही दिसत नाहीये; सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका
- Sanjay Raut | राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्लाची भीती – संजय राऊत
- Uddhav Thackeray | हिंदुत्वाच्या नावावर निरपराध्यांचं रक्त सांडलं जातंय; ठाकरे गटाचा भाजप सरकारवर हल्लाबोल
- Eknath Khadse | राष्ट्रवादीला मोठा झटका! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच नेत्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश