Eknath Khadse | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.
एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेलेल्या पाच पदाधिकाऱ्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या चिंतेत नक्कीच भर पडणार आहे.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये गेलेले पाच नेते भारतीय जनता पक्षामध्ये परतले आहे. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील, शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे यांनी भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.
हे पाचही नेते एकनाथ खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. एकनाथ खडसे यांच्यासह नऊ नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
मात्र, यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे गट आणि राष्ट्रवादीला मोठा झटका आहे.
Who will get NCP party symbol and name?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठं विधान केलं आहे.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव कोणाला मिळेल? याबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. राष्ट्रवादीचा निर्णय निवडणूक आयोग 30 सप्टेंबर पर्यंत देईल, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो.
निवडणूक आयोग हा निर्णय अजित पवार यांच्याच बाजूनं देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडंच राहणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | सार्वजनिक रडण्याचा ‘रुदाली’चा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण – आशिष शेलार
- Sanjay Shirsat | उद्धव ठाकरे आजकाल रामदास आठवलेंची कॉपी करताय – संजय शिरसाट
- Ajit Pawar | मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष; अजित पवार स्पष्टच बोलले
- Vijay Wadettiwar | शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजित दादांना मुख्यमंत्रीपद नाही – विजय वडेट्टीवार
- Chitra Wagh | पवित्र भावना समजण्याइतकं तुमचं मन संवेदनशील नाही; चित्र वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका