Share

Vijay Wadettiwar | शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजित दादांना मुख्यमंत्रीपद नाही – विजय वडेट्टीवार

🕒 1 min readVijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच  अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.Related News for Youराष्ट्रवादीत खडाजंगी, पण रात्री उशिरा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच  अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.

अशात विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी एक अट घातली आहे. शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही, हीच भाजपची अट आहे.

सध्या राज्य सरकारमध्ये एकाची बैलगाडी आहे तर दुसऱ्याचा बैल आहे. तर ही बैलगाडी हाकणारा तिसराच व्यक्ती आहे. या सर्व गोष्टींमुळे कधी कुणाची लॉटरी लागेल? काही सांगता येत नाही.”

People did not want to sit in Ajit Pawar’s meeting – Vijay Wadettiwar

दरम्यान, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अजित पवार यांच्या काल झालेल्या सभेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवार यांच्या सभेला बसण्याची लोकांना इच्छा नव्हती.

त्याचबरोबर या सभेसाठी लोकांमध्ये अजिबात उत्साह नव्हता. अजित पवार भाषण करत असताना लोकांच्या टाळ्या वाजत नव्हत्या. सभेत अजित पवार काय बोलणार? काय सांगणार?

बेइमानी केली म्हणून सांगणार का? पक्ष फोडला म्हणून सांगणार का? लोकांना या सगळ्या गोष्टी दिसत आहे. त्यामुळं जनता विश्वास ठेवायला तयार नाही. यांच्या सभांना काहीच अर्थ नाही. यांची जिरवायची असा जनतेनं निर्णय घेतला आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!