Share

Vijay Wadettiwar | अजित पवारांच्या सभेला लोकांची बसण्याची इच्छा नव्हती – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: काल (27 ऑगस्ट) बीड शहरामध्ये अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. सभेत जेव्हा अजित पवारांनी भाषण करायला सुरुवात केली तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवत खुर्च्या रिकाम्या केल्या. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या सभेला लोकांना बसण्याची … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: काल (27 ऑगस्ट) बीड शहरामध्ये अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. सभेत जेव्हा अजित पवारांनी भाषण करायला सुरुवात केली तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवत खुर्च्या रिकाम्या केल्या.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या सभेला लोकांना बसण्याची इच्छा नव्हती, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

People had no enthusiasm for Ajit Pawar’s meeting – Vijay Wadettiwar

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “अजित पवार यांच्या सभेसाठी लोकांमध्ये अजिबात उत्साह नव्हता. अजित पवार यांच्या सभेदरम्यान लोकांच्या टाळ्या वाजत नव्हत्या. या सभेला लोकांची बसण्याची इच्छा नव्हती. कारण अजित पवार बोलणार काय?

त्याचबरोबर सांगणार काय? बेईमानी केली म्हणून सांगणार का? पक्ष फोडला म्हणून सांगणार का? आपल्या पक्षाशी गद्दारी केली असं सांगणार का? जनतेच्या मतांची प्रतारणा केली हे सांगणार का? या सर्व गोष्टी लोकांना दिसत आहे.

त्यामुळं जनता विश्वास ठेवायला तयार नाही. बसूया, बघूया या या दृष्टीने लोकं सभांना येतात. मात्र लोकांचा भ्रमनिराश झाला की ते निघून जातात. म्हणून यांच्या सभांना काहीच अर्थ नाही. यांची जिरवायची असा जनतेने निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या या सभेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्हाला सत्तेची हाव नाही असं अजित पवार म्हणतात.

त्यांना जर सत्ता हवी नव्हती तर त्यांनी मंत्री पदाची शपथ कशाला घेतली? त्यांना फक्त विकास कामं करायची असतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घ्यायला हवं.

महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्य करण्याची मोठी परंपरा आहे. त्यासाठी तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे? सत्ता कशासाठी पाहिजे?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही