Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरला मोठा झटका! बच्चू कडू दोन दिवसात वकिलांमार्फत बजावणार नोटीस

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: प्रहारचे आमदार बच्चू कडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या हात धुवून मागे पडले आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमध्ये भाग घेऊ नये, असं बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांना वकिलांमार्फत नोटीस बजावणार आहे. 30 ऑगस्ट रोजी बच्चू कडू ही नोटीस तेंडुलकर यांना पाठवणार आहे.

We will announce a protest against Sachin Tendulkar – Bacchu Kadu

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार असल्याची चिन्ह दिसत आहे. कारण बच्चू कडू (Bacchu Kadu) सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकिलामार्फत कायदेशीर बजावणार आहे.

वकिलांमार्फत नोटीस पाठवल्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा करू, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरात माघार घेतली नाही, तर त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

“सचिन तेंडुलकर भारताचा अभिमान आहे. त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळं ऑनलाइन गेमबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे.

ऑनलाइन गेम जाहिरातीतून तेंडुलकर यांनी बाहेर पडावं, अशी आमची मागणी आहे. त्यांनी आमची मागणी ऐकली नाही तर आम्हाला यावर वेगळा मार्ग शोधावा लागेल.

सचिन तेंडुलकर यांनी आमचं ऐकलं नाही तर प्रहार स्टाईलनं आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करू”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.