Share

Vinayak Raut | अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच सत्तेत सामील झालेय – विनायक राऊत

Vinayak Raut | हिंगोली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. सत्तेत सामील होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Published On: 

Vinayak Raut | हिंगोली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

सत्तेत सामील होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच सत्तेत सामील झाले असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar has joined the state government to become the Chief Minister – Vinayak Raut 

उद्या (27 ऑगस्ट) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीमध्ये जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची ही सभा यशस्वीरित्या व्हावी, यासाठी विनायक राऊत (Vinayak Raut) आजच हिंगोलीमध्ये दाखल झाले आहे.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाचे उत्तर देत विनायक राऊत म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत सामील झाले आहे.

त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे. अजित पवारांनी मंत्रालयामधील वॉर रूम देखील ताब्यात घेतली आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटानं काल अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अंतर्गत वादामध्ये मला पडायचं नाही. मात्र काल कोल्हापूरमध्ये शरद पवार गटानं  अजित पवार गटावर जो हल्लाबोल चढवला होता, तो जबरदस्त होता.

त्यांच्या त्या टीकेला मी महत्त्व देतो. महाराष्ट्र ही योद्धांची भूमी आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात दोन प्रकारे युद्ध लढले गेले आहे. एक म्हणजे मैदानात उतरून आणि दुसरे म्हणजे गनिमी काव्याने. शरद पवार गनिमी काव्याने युद्ध करत आहे तर आम्ही मैदानात उतरून युद्ध करण्याचा पर्याय निवडला आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही