Sanjay Raut | शरद पवार गनिमी काव्याने लढताय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: काल (25 ऑगस्ट) कोल्हापूर शहरामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान शरद पवारांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.

शरद पवार गटाच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही मैदानात उतरून युद्ध करत आहोत आणि शरद पवारांनी गनिमी काव्याचा मार्ग स्वीकारला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar will never go with BJP – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांच्या अंतर्गत वादामध्ये मला पडायचं नाही. मात्र, काल कोल्हापूरमध्ये शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवार गटावर जो हल्लाबोल चढवला होता तो जबरदस्त होता.

त्यांच्या त्या टीकेला मी महत्त्व देतो. शरद पवार भारतीय जनता पक्षसोबत कधीच जाणार नाही. मात्र अजित पवार नक्की कोणती भूमिका बजावत आहे? माहित नाही. अजित पवार सध्या अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करत आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्र ही योद्ध्यांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक युद्ध लढली गेली आहेत. ही युद्ध दोन प्रकारे लढली गेली आहे.

एक म्हणजे मैदानावर उतरून आणि दुसरी म्हणजे गनिमी काव्याने. आम्ही मैदानात उतरून युद्ध करत आहोत. तर शरद पवारांनी गनिमी काव्याचा मार्ग निवडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केलेल्या लोकांशी शरद पवार गनिमी काव्याने लढत आहेत. आम्हाला या युद्धामध्ये नक्की यश प्राप्त होईल.”

दरम्यान, काल कोल्हापूर शहरामध्ये शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलत असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.

ते म्हणाले, “राज्यामध्ये सध्या गद्दारी दिसू लागली आहे. बिळात लपून बसलेले साप आता बाहेर पडू लागले आहे. या बाहेर आलेल्या सापांना ठेचण्याची वेळ आली आहे.

त्यांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागणार आहे. त्यांना ठेचण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रानं कोल्हापुरी चप्पलचा वापर करावा, अशी मी इच्छा व्यक्त करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.