Hasan Mushrif | मुंबई: काल (25 ऑगस्ट) कोल्हापूर शहरामध्ये शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे.
कारण या सभेमध्ये बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर खोचक टीका केली आहे.
बिळातून बाहेर आलेल्या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागणार आहे, असं म्हणतं जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. आव्हाडांच्या या टीकेला मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jitendra Ahwad is much junior to me – Hasan Mushrif
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला उत्तर देत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार साहेबांवर काय जादू केली आहे? काय माहित. आव्हाड मला खूप जुनियर आहे.
जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं त्यांनी आमच्याबद्दल बोलायला नको. शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी आम्ही शरद पवारांना एक पत्र दिलं होतं.
त्या पत्रावर 53 स्वाक्षऱ्या होत्या. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या स्वाक्षरीचा देखील समावेश होता. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर चप्पल प्रसिद्ध नाही तर कपाशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती चप्पल जितेंद्र आव्हाड यांना एकदा बसली की त्यांना कळेल.”
दरम्यान, काल कोल्हापूरमध्ये शरद पवारांची सभा पार पडली आहे. या सभेमध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, “राज्यामध्ये सध्या गद्दारी दिसू लागली आहे. सर्व बिळात लपून बसलेले साप आता बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे या सापांना आता ठेचण्याची वेळ आली आहे.
त्यांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागणार आहे. कोल्हापूरमधील चप्पल अत्यंत प्रसिद्ध आहे. या चपलेचा वापर महाराष्ट्राने सापांना ठेचण्यासाठी करावा, अशी मी इच्छा व्यक्त करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | मंत्रीपद देऊनही हसन मुश्रीफांचं रडगाणं सुरू – जितेंद्र आव्हाड
- Nawab Malik | नवाब मलिक कोणत्या गटाला पाठिंबा देणार? मलिकांच्या मुलीनं स्पष्टच सांगितलं
- Hasan Mushrif | नो कमेंट्स; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हसन मुश्रीफांची दोन शब्दात प्रतिक्रिया
- Sharad Pawar | काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट पडत नाही – शरद पवार
- Uddhav Thackeray | सत्ता येताच मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा सुरू केलीय; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल