Sharad Pawar | कोल्हापूर: काल (25 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक वक्तव्य चर्चेत होतं. अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर शरद पवारांनी काल सकाळी पत्रकारांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता.
मात्र, त्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवारांनी अजित पवार आमचे नेते आहे, असं मी बोललो नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
आमच्या पक्षात फूट नाही, असं मी म्हटलं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट पडत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
A party is a party organization – Sharad Pawar
प्रसार माध्यमांशी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “पक्ष म्हणजे आमदार नव्हे. पक्ष म्हणजे पक्ष संघटना. आमच्यातील काही आमदार बाजूला गेले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
त्या आमदारांना त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं होतं. त्यामुळं एखाद्या पक्षातील काही आमदार बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फुट असा होत नाही.”
दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या पक्षात फूट पडलेली आहे असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, “माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे. पक्षप्रमुख आणि पक्षाचे विचार बाजूला ठेवून शिवसेनेतून एक गट बाजूला झाला होता.
त्यांनी पक्षद्रोह केला आहे. त्यामुळं आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून देखील एक गट बाहेर पडला आहे. त्या गटानं आपले विचार बाजूला ठेवून भाजपशी हातमिळवणी केली आहे.
याला फूट नाही तर काय म्हणायचं? राष्ट्रवादीच्या एका गटांना ईडीच्या भीतीनं भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तर शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारा राष्ट्रवादीचा दुसरा गट महाविकास आघाडीमध्ये आहे. याला आम्ही फुटत म्हणतो.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | सत्ता येताच मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा सुरू केलीय; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी
- Supriya Sule | अजित पवारांवर कारवाई करणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Supriya Sule | अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे – संजय राऊत