Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी केलं होतं.

त्यानंतर दुपारी शरद पवारांनी यूटर्न घेतला. अजित पवार आमचे नेते आहे, असं मी म्हटलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नाही, असं मी म्हटलं असल्याचं शरद पवार यांनी आज दुपारी स्पष्ट केलं आहे.

या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

There is a split in the NCP party – Sanjay Raut 

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार हे महाविकास आघाडीतील नेते आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे शरद पवार प्रमुख घटक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे की नाही? हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे.

पक्षाचे आणि पक्षप्रमुखाचे विचार बाजूला ठेवून शिवसेनेतून एक गट बाजूला झाला आहे. त्यांनी पक्षद्रोह केला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून देखील एक गट बाहेर पडला आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटानं आपले विचार बाजूला ठेवून भाजपशी हातमिळवणी केली आहे.

त्यानंतर त्या पक्षानं अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची हकलपट्टी केली. याला फूट नाही म्हणायची तर काय म्हणायचं?

पुढे बोलताना ते (Sanjay Raut)  म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन प्रदेशाध्यक्ष आहे. जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवार गटाचे आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) अजित पवार गटाचे. ही फुट नाही का?

अजित पवारांनी शरद पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. याला आम्ही फुटचं म्हणतो. लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही.

राष्ट्रवादीच्या एका गटानं ईडीच्या भीतीनं भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तर शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारा राष्ट्रवादीचा दुसरा गट महाविकास आघाडीमध्ये आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.