Dhananjay Munde | अखेर देवानं आम्हाला आशीर्वाद दिला; शरद पवारांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Dhananjay Munde | मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं विधान केलं आहे.

अजित पवार आमचे नेते आहे. काही लोक भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले म्हणजे आमच्या पक्षात फूट पडली, असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशात शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवानं आम्हाला आशीर्वाद दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar blessed us – Dhananjay Munde

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) म्हणाले, “शरद पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना करत होतो.

देवानं आमची ही प्रार्थना ऐकली आहे आणि आमच्या कामाच्या माणसाला आशीर्वाद दिला आहे, असं मला शरद पवार यांच्या विधानावरून वाटत आहे. देवानं आम्हाला आशीर्वाद दिला आहे.

दरम्यान, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगाकडं जाईल. त्यामुळं आपलं चिन्ह आणि आपला पक्ष वाचवण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, असं माझं वैयक्तिक मत आहे.

परंतु अशा विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हे खरं आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. मात्र, शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या विधानाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.