Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आणि चांद्रयान मोहिमेवरून उद्धव ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
शेतकरी कांदा फेकून देण्याची वेळ आल्याने सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करीत आहे.
राज्यकर्ते मात्र गुरुवारी शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Narendra Modi is there to worry about the country – Chandrashekhar Bawankule
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करत आहेत.
करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.
संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.
अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही.
कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीसजींनी (Devendra Fadnavis) जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली.
उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मा. मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल.”
ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्यावर टीका करत आहेत.
करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.संपूर्ण जगात…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 25, 2023
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | ‘मिशन सन’ ठीक, आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | 2024 नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
- Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते – शरद पवार
- Vijay Wadettiwar | अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ येणार – विजय वडेट्टीवार
- Sanjay Shirsat | शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली; संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले