Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, आगामी काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील, असं सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
2024 नंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असं आमच्या नेतृत्वानी स्पष्ट केलं आहे.
याबाबत मी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, 2023 नंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
कार्यकर्त्यांनी जर अशी भावना व्यक्त केली असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं. तर आमच्या कार्यकर्त्यांना असं का वाटू नये?”
We have never tried to break anyone’s party – Chandrashekhar Bawankule
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर खोचक टीका केली होती. भाजपने दोन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. तर तिसऱ्या वेळी भाजपने पूर्ण तयारी करून राष्ट्रवादी फोडली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “आम्ही कधीच कोणाचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही.
मुळात पक्ष फोडण्याचे आमच्यावर संस्कार नाही आणि तो आमचा स्वभाव देखील नाही. एकनाथ शिंदे हिंदुत्वाची साथ देण्यासाठी आमच्या सोबत आले.
तर नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार सत्तेत सामील झाले. ज्यांनी आतापर्यंत पक्ष फोडण्याचं राजकारण केलं आहे, ते आज आमच्यावर टीका करताना दिसत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते – शरद पवार
- Vijay Wadettiwar | अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ येणार – विजय वडेट्टीवार
- Sanjay Shirsat | शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली; संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Chandrashekhar Bawankule | आमच्यावर पक्ष फोडण्याचे संस्कार नाही; बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
- Hasan Mushrif | रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची- हसन मुश्रीफ