Chandrashekhar Bawankule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
भाजपने या आधी दोन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. परंतु तिसऱ्या वेळी पूर्ण तयारी करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
We have never tried to break anyone’s party – Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय झालं? हे एकदा इतिहासात जाऊन बघा. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखे मर्द मराठे नेते हिंदुत्वाची साथ देण्यासाठी भाजपसोबत आले.
तर नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) आमच्यासोबत सामील झाले. आम्ही कधीच कुणाचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही.
मुळात आमच्यावर पक्ष फोडण्याचे संस्कार नाही आणि आमचा तो स्वभाव देखील नाही. ज्यांनी आयुष्यात फक्त पक्ष फोडण्याचं राजकारण केलं आहे, ते आज आमच्यावर टीका करत आहे.
ज्यांना स्वतःचं घर सांभाळायला जमलं नाही, त्यांनी आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही.”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रोची चांद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पार पडली. काही गोष्टी वेळ आणि काळ ठरवत असते.
त्याचप्रमाणे शरद पवारांचं मन परिवर्तन एक ना एक दिवस नक्की होईल. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आमच्य सोबत येतील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.
मात्र, त्यांचं मन परिवर्तन झालं आणि ते महायुतीत सामील झाले. त्यांच्याप्रमाणे एक दिवस शरद पवारांचं मन परिवर्तन नक्की होईल, असं मला अजूनही वाटत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif | रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची- हसन मुश्रीफ
- Chitra Wagh | कुछ लोग बातों में खुद की औकात बता देते हैं; चित्रा वाघांचा संजय राऊतांना टोला
- Anil Deshmukh | मुळात बावनकुळेंची उंची कमी; अनिल देशमुखांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर
- Sanjay Raut | 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात आमचं सरकार येणार – संजय राऊत
- Chandrashekhar Bawankule | शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये – चंद्रशेखर बावनकुळे