Hasan Mushrif | मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर खोचक टीका केली.
1998 मध्ये नेत्यांचा विरोध असतानाही शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांना संधी दिली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar is a young leader – Hasan Mushrif
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, “रोहित पवार युवा आणि नवखे नेते आहे. त्यांना शरद पवार गटामध्ये अजित पवारांची जागा घ्यायची आहे.
त्यामुळं ते एवढं धाडस करताना दिसत आहे. त्यांच्याकडं सध्या बोलायला आणि आरोप करायला काहीच नाही. त्यामुळं ते अशा प्रकारचं विधानं करत आहे. 1998 मध्ये मला कुणी विरोध केला होता, याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगावं.”
शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार गटाला त्यांचा फोटो न वापरण्याच्या सूचना दिल्या असल्याचं म्हटलं जात आहे. या मुद्द्यावर बोलत असताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, “आमच्यापैकी कोणीही कोर्टात जाणार नाही, हे आधी ठरलं होतं.
मात्र, तरीही फोटोच्या मुद्द्यावरून शरद पवार कोर्टात जाणार असतील, तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. 05 जुलै रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही एकच पक्ष आहोत. तरी देखील या प्रकारच्या घटना घडत आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या फोटो प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
ते म्हणाले, “शरद पवारांनी त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या, त्यांचा फोटो वापरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेणं बंद केलं पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांचा फोटो आदराने वापरतात आणि त्यांना भेटायला जातात. म्हणून शरद पवारांनी त्यांच्या विरोधात जाऊन आपली उंची कमी करून घेऊ नये.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | कुछ लोग बातों में खुद की औकात बता देते हैं; चित्रा वाघांचा संजय राऊतांना टोला
- Anil Deshmukh | मुळात बावनकुळेंची उंची कमी; अनिल देशमुखांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर
- Sanjay Raut | 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात आमचं सरकार येणार – संजय राऊत
- Chandrashekhar Bawankule | शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | जयंत पाटील अजित पवार गटात जाणार? ‘त्या’ घटनेवरून चर्चांना उधाण