Share

Chitra Wagh | कुछ लोग बातों में खुद की औकात बता देते हैं; चित्रा वाघांचा संजय राऊतांना टोला

🕒 1 min read Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काल (23 ऑगस्ट) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती. सध्या राजकारणामध्ये जे पापी लोक आहे, त्यांना आपल्याला संपवायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता. Related News for Youअरविंद सावंत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काल (23 ऑगस्ट) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती.

सध्या राजकारणामध्ये जे पापी लोक आहे, त्यांना आपल्याला संपवायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली होती. घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कधीच कुणाला संपवू शकत नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. कोण बावनकुळे? मला माहित नाही, मी त्यांना ओळखत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

अशात आता राऊत यांच्या या वक्तव्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Some people show their worth by talking – Chitra Wagh

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी हिंदीच्या चारोळी ट्विट करत संजय राऊत यांना सुनावलं आहे.

काही लोक बोलताना स्वतःची लायकी दाखवून देतात, असं म्हटलं चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “चंद्रशेखर बावनकुळे कोण म्हणणा-या सर्वज्ञानी संजय राऊतांसाठी

कुछ लोग बातो हीं बातों में
खुद की औकात बता देते हैं
हमारे दरवाजे पे पडे रहते थे कभीं
जाने क्यों, पहचान भूला देते हैं !”

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, “गेले तीस वर्ष आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं काम आणि दरारा पाहिला आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांना आणखीन लोक सोडून जाणार आहे. 2024 पर्यंत त्यांच्यासोबत फक्त तीन ते चार लोक राहतील. त्याचबरोबर घरात बसून पक्ष चालवणारे लोक कुणाला कधीच संपवू शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही