Chandrashekhar Bawankule | घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाही; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | नागपूर: काल (23 ऑगस्ट) शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला.

त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संगमनेर, शिर्डी आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित कार्यकर्त्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं होतं.

यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती. सरकारी तपास यंत्रणांचा वापर करून माझ्या शिवसैनिकांना जे लोक छळत आहे. त्याचा शिवसैनिक बदला घेणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कधीच कुणाला संपवू शकत नाही.

गेले तीस वर्ष आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं काम आणि दरारा पाहिला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांना आणखीन लोक सोडून जाणार आहे. तर 2024 पर्यंत त्यांच्यासोबत फक्त तीन ते चार लोक राहतील.”

Shivsainik apologizes for the mistake – Uddhav Thackeray

दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. ते म्हणाले, “पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे मला भेटले होते.

तेव्हा त्यांनी मातोश्रीची आणि माझी माफी मागितली. माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण माझ्या शिवसैनिकांची माफी मागा, असं मी त्यांना त्यावेळी म्हटलं होतं.

कारण शिवसैनिक चुकीला माफी देतो पण पापाला माफी देत नाही. सध्या राजकारणामध्ये जे पापी लोक आहे, त्यांना आपल्याला संपवायचं आहे.

आजपर्यंत राजकारणामध्ये आपण अनेक पक्षांतर पाहिली आहे. मात्र, पक्ष फोडण्याचा आणि संपवण्याचा कटकारस्थान करणारे राजकारणी आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाहिले.

आपल्याला त्यांची ही मस्ती उतरवायची आहे. हिम्मत असेल तर समोर या, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, असं आवाहन मी त्यांना साईबाबांच्या साक्षीनं करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.