Anil Bonde | अमरावती: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे.
तर या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला होता. या निर्णयावरून शरद पवार यांनी देखील सरकारवर टीका केली होती.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेवर भाजप खासदार अनिल भोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना बोलायला नाक उरलं नाही, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, “शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणलेली नाही.
सरकारनं फक्त कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावला आहे. शेतकऱ्यांना हा निर्णय पटला नाही म्हणून केंद्र सरकारनं लगेच तोडगा काढत 2 लाख मेट्रिक टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
2410 रुपयांनी केंद्र सरकार हा कांदा खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची सरकारने पूर्णपणे काळजी घेतली आहे.”
Sharad Pawar has not done any good work for farmers – Anil Bonde
पुढे बोलताना ते (Anil Bonde) म्हणाले, “शरद पवार कृषि मंत्री असताना कांद्याबाबत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी त्यांनी कांदा निर्यातीवर बंदी लागू केली होती.
मात्र आत्ता सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातलेली नाही. सरकारनं फक्त कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे. त्यामुळे खरंतर विरोधकांना बोलण्यासाठी नाक राहिलेले नाही.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या काळात कोणतंही चांगलं काम केलं नाही आणि शरद पवार हे विसरले आहे. त्यावेळी शरद पवारांनी कापसाची निर्यात थांबवली होती आणि कांद्याची निर्यात बंद केली होती. या गोष्टी शरद पवार विसरले असतील.”
दरम्यान, या मुद्द्यावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, ” 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने सरकार कांदा खरेदी करणार आहे.
मात्र, ही किंमत खूप कमी आहे. सरकारनं 4000 प्रतिक्विंटल रुपयांनी कांदा खरेदी करायला हवा. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न करणारा आहे. त्याचबरोबर 2410 रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेवर कधी कारवाई होईल? राहुल नार्वेकर म्हणतात…
- Uddhav Thackeray | शिवसैनिक चुकीला माफी देतो, पाप करणाऱ्यांना नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ! माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरे गटात
- Jayant Patil | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची STI चौकशी करा; जयंत पाटलांची राज्य शासनाला मागणी
- Rohit Pawar | तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका; रोहित पवारांचा संजय शिरसाटांना टोला