Rohit Pawar | कऱ्हाड: 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
त्यांची सभा यशस्वीरित्या व्हावी, यासाठी रोहित पवार दोन दिवस आधीच कोल्हापूर शहरामध्ये दाखल झाले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी कराडमध्ये काही वेळ थांबून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलत असताना रोहित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर खोचक टीका केली आहे. तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला रोहित पवारांनी शिरसाटांना लगावला आहे.
For us, thought is more important than ministry – Rohit Pawar
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “संजय शिरसाट यांना मंत्री व्हायचं आहे आणि याबाबत ते स्वतः बोलले आहे. संजय शिरसाट प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठेतरी दुखत आहे.
मंत्री पदासाठी आम्ही लाचार नाही. त्याचबरोबर आम्ही आमची नियत कुठे विकलेली नाही. म्हणून तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडू नका. आमच्यासाठी मंत्रीपदापेक्षा विचार महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, शरद पवार यांच्या सभेपूर्वी रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर देखील खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे राजकीय विचार जिथे संपतात तिथे शरद पवारांचे विचार सुरू होतात.
शरद पवारांचा राजकीय अनुभव 60 वर्षाचा आहे. भाजपने आत्तापर्यंत पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. शरद पवार आधीपासूनच भाजपला टार्गेट करतात.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील गेल्या वर्षापासून भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गट एकमेकात भांडत राहिले.
परंतु या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष बाजूला राहिला. हे सर्व जर भाजपमुळे घडत असेल तर त्याला टार्गेट करायला काय हरकत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | बंडखोरीनंतर अजित दादा पहिल्यांदाच जाणार बारामतीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Rohit Pawar | जिथे भाजपचे विचार संपतात, तिथे पवार साहेबांचे सुरू होतात – रोहित पवार
- Rohit Pawar | शरद पवारांनी सभेसाठी दसरा चौक मैदान का निवडले? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
- Eknath Shinde | CM शिंदेंच्या चिंतेत वाढ! बड्या नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
- Ramdas Athawale | मी आठवले ऐवजी आंबेडकर झालो असतो; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य