Rohit Pawar | शरद पवारांनी सभेसाठी दसरा चौक मैदान का निवडले? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची कोल्हापूर शहरामध्ये 25 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार आहे.

शरद पवारांची सभा यशस्वीरित्या व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार आज कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. कोल्हापूरमध्ये दाखल होतच रोहित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवारांच्या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. या सभेसाठी शरद पवारांनी दसरा चौक मैदान का निवडले? याबाबत रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

Sharad Pawar has deliberately chosen Dussehra Chowk Maidan for the meeting – Rohit Pawar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “कोल्हापूर शहरातील सभेसाठी शरद पवारांनी मुद्दाम दसरा चौक मैदान निवडले आहे.

कारण शरद पवारांना या मैदानातून शाहू, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी विचार देशाला सांगायचे आहे. पुरोगामी विचारांची ताकद शरद पवारांना संपूर्ण राज्याला सांगायची आहे. या सभेसाठी जागा कमी पडेल, अशी आम्हाला भीती वाटत आहे.”

पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवारांच्या सोबत आहे. त्याचबरोबर हे कार्यकर्ते त्यांची ताकद आहे. ज्यांना सत्ता हवी होती, ते सत्तेत गेले.

मात्र, खरे आणि निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत राहिले आहे. सध्या जे कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहे ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतील. त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे.”

दरम्यान, शरद पवार यांच्या सभेवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “शरद पवारांनी सभा कुठे घ्यावी? हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे.

आम्ही आमचा टेंभा मिरवत आहोत, असं कृपया कोणीही समजून घेऊ नये. आम्हाला जे योग्य वाटतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.

विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र, सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. तुम्ही याबद्दल कुणालाही खाजगीत प्रश्न विचारू शकतात.

महत्वाच्या बातम्या