Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू – रामदास आठवले

Ramdas Athawale | यवतमाळ: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज बांधणं आता कठीणच नाही तर अशक्य झालं आहे.

अशात रामदास आठवले यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी इंडिया आघाडीसोबत येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

नितीन गडकरी आमच्यासोबत आले तर त्यांना आम्ही पंतप्रधान पदाची ऑफर देऊ, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र, विनायक राऊत यांच्या ऑफरला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही.

राऊत जर गडकरींना ऑफर देत असतील तर मी देखील उद्धव ठाकरे यांना एक ऑफर देत आहे. उद्धव ठाकरे जर आमच्यासोबत आले तर त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू.”

We should get ministership – Ramdas Athawale

यावेळी बोलत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “अजित पवार भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजपच्या मतांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. मात्र, आम्हाला मंत्रिपद मिळालेलं नाही. आम्हाला मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही मागणी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांचा समावेश होईल, याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. मात्र, तसं झालं असलं तरी आम्हाला मंत्रिपद मिळावं, अशी आमची मागणी आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.