Ajit Pawar | कांद्याच्या मुद्द्यावरून दादा गट आणि भाजप आमने-सामने; अजित पवार म्हणाले, “आम्हाला श्रेय…”

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज कांदा खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis,) यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.

तर त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत सांगितलं.

यानंतर भाजप आणि अजित पवार गटात या निर्णयाच्या श्रेयावरून वाद सुरू झाला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. या चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis and we are part of the same government – Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडे (Dhananjay Munde), देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकाच सरकारचा भाग आहोत. त्यामुळे आमच्यात या प्रकरणाच्या श्रेयावादाची लढाई सुरू नाही.

आम्ही श्रेयासाठी सत्तेत सामील झालेलो नाही. आम्हाला वाटलं तर आम्ही श्रेय घेऊ. त्यात इतरांना काय अडचण आहे? टीका करणारे शेतकऱ्यांची मदत करत नाही.”

दरम्यान, या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.

नाफेडच्या माध्यमातून नाशिक आणि इतर ठिकाणच्या केंद्रावरील कांदा खरेदी केला जाईल. 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करणार आहे.

महाराष्ट्रातील गोरगरीब जनता अडचणीत सापडू नये, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखीन गरज पडल्यास केंद्र सरकार राज्याला सहकार्य करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.