Ramdas Athawale | महाराष्ट्रात पिकतो कांदा महाविकास आघाडीचा झालाय वांदा – रामदास आठवले

Ramdas Athawale | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे. यानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावरून रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर कवितेच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे.

Onion is very essential for everyone – Ramdas Athawale

प्रसार माध्यमांशी बोलत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “कांद्याच्या किमतीवरून शेतकरी नाराज आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे.

शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे पियुष गोयल यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहे. कांदा सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळालाच पाहिजे.”

या मुद्द्यावर भाष्य करत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कवितेच्या माध्यमातून महाविकास विकास आघाडीवर खोचक टीका केली आहे.

“महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकतो कांदा, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकतो कांदा, महाविकास आघाडीचा झाला आहे वांदा”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

“महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.

केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.