Navneet Rana | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धमकीचा फोन आल्यानंतर नवनीत राणा यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची तातडीने चौकशी करायला सुरुवात केली आहे.
तू नेहमी गर्दीच्या ठिकाणी जात असते. त्या ठिकाणी तुझ्यावर कधीही चाकूने हल्ला होऊ शकतो. मी कधीही तुझ्यावर धारदार चाकूने वार करेल आणि तुला ते कळणार देखील नाही.
8805541949 या क्रमांकावरून मला कॉल आला होता. मी तिवसामधून विठ्ठल राव नामक बोलतो आहे, असं त्या व्यक्तीनं मला सांगितलं होतं, असं नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
The incidents of threatening calls to leaders are increasing day by day
दरम्यान, नेत्यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील जीवे-मारण्याची धमकी मिळाली होती.
त्यानंतर आता नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे-मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशा प्रकारची धमकी देणाऱ्या माथेफिरूंवर त्वरित कारवाई करावी, असं नवनीत राणा यांच्या स्विय सहायकानं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | देवेंद्र फडणवीसांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या समजलेली नाही – रोहित पवार
- Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकार करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी
- Rohit Pawar | गावित साहेब युवकांना प्रेमाचे नाही तर शिक्षणाचे सल्ला द्या – रोहित पवार
- Sanjay Raut | कांदा परवडत नसेल तर खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांची दादा भुसेंवर टीका
- Vijay Wadettiwar | सध्याचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा – विजय वडेट्टीवार