Sanjay Raut | मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणावर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. दोन-तीन महिने कांदा खाणं परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं दादा भुसे यांनी म्हटलं होतं.
दादा भुसे यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Onion is the food of the poor people – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सामान्य माणसांनी कांदा आणि भाकरी खायची नाही. मात्र, या नेत्यांच्या घरी कांद्याचे पोते पडलेले आहे. कांदा हे गरिबांचा खाणं आहे. कांदा हे श्रीमंतांचं खाणं नाही.
शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. सामान्य घरातील गृहिणींनी कांद्यापासून वंचित राहू नये, हे आमचं म्हणणं आहे.
एखादी गोष्ट खायला मिळत नाही तर ती खाऊ नका असं जर सरकारचं म्हणणं असेल, तर मग सरकार म्हणून तुमचा काय उपयोग? परवडत नसेल तर कांदा खाऊ नका सांगणारे मंत्री दीडशहाणे आहे. कालपर्यंत ते राज्याचे कृषिमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती माहिती आहे का?
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “कांद्यामुळे दिल्लीतील भाजपचं सरकार गेलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये तीच वेळ आलेली दिसत आहे.
आम्ही जनतेला काहीही बोलू शकतो, जनतेला काहीही सल्ले देऊ शकतो, हा सरकारचा मस्तवालपणा आहे आणि ही सर्व परिस्थिती खोक्यातून निर्माण झाली आहे.
मात्र, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका असं सरकार सांगत आहे. परंतु, ती गोष्ट उपलब्ध करून देण्याचं काम सरकारचं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | सध्याचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Uddhav Thackeray | “मोदी सरकारचे ‘खायचे दात’ अन्…”; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Amol Mitkari | गावित आदिवासींचे प्रश्न सोडून ऐश्वर्या रायचे डोळे बघतात – अमोल मिटकरी
- Sanjay Shirsat | “त्यांनी या वयात असं बोलायला…”; गावितांनी ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानावर शिरसाटांची प्रतिक्रिया